तळा: तळा तालुक्यातील कुडा लेणी येथील विकास कामांची केली महीला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी पाहणी
Tala, Raigad | Jan 11, 2025 कुडालेणी (ता.तळा) येथे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पर्यटनासाठी मूलभूत सुविधा निर्माण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या विकास कामाची पाहणी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच कामे जलद गतीने व दर्जेदार व्हावीत यासाठी स्वतः लक्ष ठेवून असणार आहे हा विश्वास अदिती तटकरे यांनी व्यक्त केला. यावेळी तालुक्यातील व शहरातील ज्येष्ठ मंडळी, महिला भगिनी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.