कन्नड: कन्नडमध्ये तरुणांची पोस्टरबाजीवर माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा टोला होतेय व्हायरल
सणासुदीच्या काळात तरुणाई पोस्टरबाजीमध्ये गुंग झाली आहे. कन्नडमध्ये एमआयडीसी येणार होती, त्याचं काय झालं असा सवाल माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दि १५ स्पटेंबर रोजी सांयकाळी सात वाजता उपस्थित केला.“एमआयडीसी आणा, मग तरुणांचे फोटो पोस्टरवर लावा,” असा कडवा टोला त्यांनी लगावला.या वक्तव्यामुळे कन्नडच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे.