दारव्हा: नगरपरिषद शाळा क्र. २ मुलींचा संघ पांढरकवडा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी पात्र
१७ ते १९ वयोगटातील मुलींच्या व्हॉलीबॉल सामन्यात नगर परिषद शाळा क्र. २ दारव्हा व शिवाजी हायस्कूल दारव्हा यांच्यात सामना रंगला. या सामन्यात नगरपरिषद शाळा क्र. २ च्या मुलींनी दमदार खेळ करून २१ विरुद्ध ७ अशा १४ गुणांनी विजय मिळवला. त्यामुळे शाळा क्र. २ च्या मुलींनी तालुक्यात आपली विजयी छाप उमटवली.