आज गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चनकापूर (WCL ग्राउंड) येथे आयोजित करण्यात आलेल्या सावनेर तालुका स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन माझ्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये क्रीडावृत्ती, शिस्त, संघभावना तसेच सांस्कृतिक मूल्यांची जोपासना व्हावी, हा उद्देश समोर ठेवून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पालक, शिक्षक व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली.