वाशिम: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्यावतीने बसस्थानक परिसरात सेवापंधरवड्याला स्वच्छता अभियानाने सुरूवात
Washim, Washim | Sep 17, 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा होत आहे. या उपक्रमांच्या उद्घाटनाचा प्रारंभ वाशीम बस स्थानक परिसरात दिनांक 17 सप्टेंबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वच्छता अभियानाने करण्यात आला. शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आयोजित या उपक्रमात भाजपचेपदाधिकारी, कार्यकर्ते, नगर परिषद स्वच्छता कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.