गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमरेड पोलिसांनी मोहपा फाटा येथे नाकाबंदी करून अवैध रेतीची वाहतूक करणारा १० चाकी ट्रक पकडला आहे. या कारवाईत पोलिसांनी १५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे.आरोपीचे नाव आरिफ नफीस खान वय ३१ वर्ष राहणार उत्तर प्रदेश सध्या मुक्काम - खरबी असे आहे. तो स्वतःच या वाहनाचा मालक आहे.