कोल्हापुरातील वर्षा नगर मधील प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा या मागणीसाठी नागरिक आक्रमक झालेत. वर्षा नगरातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महापालिकेवर मोर्चा काढला, आणि ठिय्या आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करत निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.