लाखनी: भंडारा जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत आदर्श हायस्कूल पारडीचा विजयश्रीचा ध्वज फडकला ; विभागीय स्पर्धेसाठी पात्र
भंडारा जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा 2025-26 अंतर्गत आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास पार पडलेल्या स्पर्धेत आदर्श हायस्कूल पारडी येथील विद्यार्थीनींनी अभुतपूर्व कामगिरी करत यश संपादन केले. 14 वर्षे वयोगटातील मुलींनी 100/4 मीटर रिले स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावित विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या स्पर्धेत आचल मेश्राम, दिव्यांका हेमने, मेघा देशमुख व स्नेहा राऊत आदी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.