सेलू: आकोली शिवारात गावठी दारू भट्टीवर एलसीबीची धडक कारवाई; ₹९४,५०० किमतीचा मुद्देमाल नष्ट, एक आरोपी अटकेत
Seloo, Wardha | Dec 11, 2025 तालुक्यातील आकोली शेत शिवार परिसरात सुरू असलेल्या गावठी मोहा दारूच्या भट्टीवर वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे ₹९४,५०० किमतीचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला असून, एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवार, दि. ११ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. अटक केलेल्या आरोपीचे नाव प्रदीप संजय पोहाणे वय २७ रा. आकोली असे आरोपीचे नाव आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून देण्यात आली.