मुंडीपार–तेढा मार्गावरील मांडोदेवी वर्कशॉप येथे गुरुवारी दुपारी 4 वाजता भीषण अपघाताची घटना घडली. प्राथमिक आरोग्य केंद्राची ॲम्बुलन्स दुरुस्तीसाठी आणण्यात आली असता अचानक आग लागून ती काही क्षणांत जळून खाक झाली. दरम्यान, ॲम्बुलन्समध्ये ठेवलेला ऑक्सिजन सिलेंडर स्फोट झाल्याने मोठा आवाज होत संपूर्ण मुंडीपार परिसर हादरून गेला. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.