रेणापूर: आ. रमेश कराड यांनी सिंधगाव डिगोळदेशमुख निवाडा ,दर्जी बोरगाव ,आरजखेडा गावातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी
Renapur, Latur | Oct 1, 2025 रेणापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची आ रमेशआप्पा कराड यांनी केली पाहणी; सरसकट नुकसानग्रस्तांना शासन मदत करणार असल्याचे दाखविले बोलून...! सततच्या पावसामुळे आणि नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त रेणापूर तालुक्यातील विविध गावांना भेटी देवून भाजपाचे नेते आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी पाहणी केली. ठिकठिकाणी शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून नुकसानीची माहिती जाणून घेतली आणि नुकसान ग्रस्तांना निश्चितपणे सरसकट शासन मदत करणार असल्याचे बोलून दाखविले.