जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती,गोंदिया महात्मा आय बँक व आय हॉस्पिटल, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर चंगेरा येथे दि.27 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 4 वाजेच्या दरम्यान यशस्वीरीत्या संपन्न झाले. या शिबिराचा चंगेरा येथील परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला. जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती च्या वतीने नागरिकांच्या दैनंदिन च्या समस्या ओळखून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला गोंदिया जिल्हा भाजपच्या जिल्हाध्यक्ष सीता रहांगडाले यांनी भेट दिली.