अकोला: नगर परिषद निवडणुकीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कलम ३६ लागू; अकोल्यात पोलीस अधीक्षकांचा विशेष आदेश जारी
Akola, Akola | Nov 30, 2025 नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३६ अंतर्गत विशेष आदेश जारी केले आहेत. दि. ४ डिसेंबर रात्री १२ वाजेपर्यंत उपनिरीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिरवणुका, जमाव, सार्वजनिक जागा, ध्वनीक्षेपक, वाहतूक व गर्दी नियंत्रणासाठी विशेष अधिकार प्रदान केले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास कलम १३४ नुसार कारवाई केली जाईल, असे आवाहन दिनांक 30 नोव्हेंबर रोजी प्रसिद्धीपत्रका द्वारे सायं