फलटण येथील घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात मार्डचे काळ्याफिती बांधून आंदोलन
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 30, 2025
फलटण येथील डॉ.संपदा मुंडे खून प्रकरणावरून छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयामध्ये मार्ड डॉक्टर आक्रमक झाले आहेत. प्रतिनिधिक स्वरूपात या घटनेचा निषेध करण्यासाठी काळ्याफिती लावून काम करण्यात येत आहे. डॉक्टर संपदा मुंडे यांचा प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा, या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, संपदा मुंडे यांच्या कुटुंबाला नोकरी व पाच कोटी रुपये द्या.