गोंदिया: गोंदिया शहराचा विकास, स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी साथ द्या–माजी आमदार राजेंद्र जैन
गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक १ ते ७ च्या पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री राजकुमार बडोले, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी प्रभाग १ते ७ मधील मोठ्या संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते. गोंदिया नगर परिषद निवडणुकीची तयारी यावर सखोल चर्चा करण्यात आली. माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी मार्गदर्शन करतांना गोंदिया शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नातून अनेक विकास कार्य झाले आहे.