रामटेक: तालुक्यातील दुधाळा - सोनेघाट रस्त्याची हालत खराब ; वाहनधारकांना होतोय त्रास
Ramtek, Nagpur | Sep 30, 2025 रामटेक ते सोनेघाट मार्गे पुढील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 ला जोडणारा रस्ता रामटेक ते सोनेघाट या दरम्यान अधिकच खराब झाल्याचे चित्र आहे. सततधार येणाऱ्या पावसाने या मार्गावर चिखल झाल्याने हा रस्ता चिखलाचा तर नाही ना असे चित्र मंगळवार दिनांक 30 सप्टेंबरला दुपारी एक वाजता च्या दरम्यान पहावयास मिळाले. मागील पंधरा दिवसांपासून सतत येणाऱ्या पावसामुळे या मार्गाची हालत अजूनच दयनीय झाली आहे.