वाळूज एमआयडीसीत कामगाराचा संशयास्पद मृत्यू ,मृतदेह कंपनीसमोर ठेवून आंदोलन
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 5, 2025
आज दिनांक 5 ऑक्टोबर दुपारी 3 वाजता वाळूज येथे आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीतील कामगार बारिस्टर हिरालाल यादव यांचा विषारी पदार्थ सेवनाने मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाइकांनी कंपनीसमोर मृतदेह ठेवून आंदोलन केले. यादव १२ सप्टेंबर रोजी रात्रपाळीसाठी गेल्यानंतर प्रकृती बिघडली व उपचारादरम्यान ३ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी कंपनीतीलच कोणीतरी विष देऊन हत्या केल्याचा आरोप केला. पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेत अंत्यसंस्कार करण्यात आले. कंपनीने घटनेचा संबंध नाकारला