जळकोट: जळकोट ते जांब बुद्रुक या राष्ट्रीय महामार्गावर ऑटो आणि दुचाकीदरम्यान झालेल्या जोरदार धडकेत एक जण ठार तर एक गंभीर
Jalkot, Latur | Oct 14, 2025 जळकोट ते जांब बुद्रुक या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर ऑटो आणि दुचाकीदरम्यान झालेल्या जोरदार धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे. मुखेड तालुक्यातील दापका राजा येथील शिवाजी बाबुराव गायकवाड व अशोक गवाले हे दुचाकीवरुन जळकोट मार्गे उदगीरला जात होते तर जळकोटकडून एक ऑटोपिकअप जांबकडे जात होता.या दोन वाहनाची समोरासमोर धडक झाली. यामध्ये हे दोघेही गंभीर जखमी झाले .