नेर: नेर नबाबपूर नगरपरिषद वर येणार महिलाराज
Ner, Yavatmal | Nov 10, 2025 नेर तालुक्यात थंडीचा कडाका वाढला असला तरी नगरपरिषद निवडणुकांच्या घोषणामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. नेर नबाबपुर नगर परिषद चे नगराध्यक्ष पद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले असून विविध प्रभागातील दहा जागाही महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे एकूणच 21 सदस्य संख्या असलेल्या या नगरपरिषदेत नगराध्यक्ष सह महिला सदस्य असणार आहे. म्हणजेच खऱ्या अर्थाने या ठिकाणी महिलाराज येणार आहे.