अंबरनाथ: लोकलला २० ते २५ मिनिट उशीर झाला झाल्याने बदलापूर रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी, प्रवाशांनी घातला गोंधळ,व्हिडिओ व्हायरल
सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास येणाऱ्या लोकलला तब्बल वीस ते पंचवीस मिनिट उशीर झाला होता त्यामुळे बदलापूर रेल्वे स्टेशनवर प्रवासाची प्रचंड गर्दी झाली होती.वेळेत कामावर जाण्यासाठी प्रवासी मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशनवर आले होते,मात्र लोकललावीस ते पंचवीस मिनिट उशीर झाल्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागला. तसेच प्रचंड गर्दी देखील रेल्वे स्टेशनवर झाली होती त्यामुळे प्रवाशांनी गोंधळ घातला असून व्हिडिओ समोर आला आहे.