धामणगाव रेल्वे नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 ची प्रक्रिया दिनांक २ रोजी पार पडली असून, नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार रविवार, 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर स्ट्रॉंग रूम परिसरात पोलीस प्रशासनाकडून कडेकोट व सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणीसाठी एकूण 7 टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून, त्यापैकी 6 टेबलांवर ईव्हीएमद्वारे मतदानाची मोजणी, तर 1 टेबलावर पोस्टल बॅलेटची मोजणी होणार आहे. नागरिकांचे निकालावर लक्ष लागले आह