दिनांक 11. 1. 2026 रोज रविवारला सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत एकल अभियान द्वारे संचालित वार्षिक उत्सव संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम श्रीहरी सत्संग भजन मंडळ प्रतियोगिता चे आयोजन मौजा पठाणटोला ग्रामपंचायत निंबा येथे आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्राम पंचायत निंबाचे सरपंच वर्षाताई विजय पटले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे.डी. जगनित सर हे होते .या कार्यक्रमांमध्ये तिगाव संच अंतर्गत एकूण एकल अभियानाचे 30 विद्यालय कार्यरत आहेत.