कारंजा: राजनी सावळी परिसरात ट्रांसफार्मरच्या उपलब्धतेमुळे ओलिताचे काम झाले सुरू.. आमदार वानखडे यांचे मानले शेतकऱ्यांनी आभार...
सारवाडी जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत सावळी येथे 33 k v सब स्टेशन येथून राजनी सावळी फिडरला वीज पुरवठा होतो शेतामध्ये ओलित काम सुरू असल्याने दोन्ही फीडरवर मागणी वाढली सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना दिवसा पुरवठा करणे शक्य नसल्याने आणि तसेच हा परिसर जंगलाला लागून असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी होत्या या संदर्भात आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार सुमित वानखडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्येची गांभीर पने दखल घेऊन नागपूर येथून ट्रांसफार्मर सब स्टेशन साठी उपलब्ध करून दिले..