धुळे: न्याहळोद ग्रामस्थांचा प्रांताधिकाऱ्यांना निवेदन — वाळू तस्करी थांबवा, अन्यथा उपोषणाचा इशारा
Dhule, Dhule | Sep 15, 2025 धुळे तालुक्यातील न्याहळोद गावाजवळून वाहणाऱ्या पांझरा नदीच्या पात्रातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे भविष्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनावर गंभीर परिणाम होणार असून, याकडे शासन आणि प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप न्याहळोद येथील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी केला आहे.