देवणी: टाकळी येथील पुरामुळे व अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना नाम फाउंडेशनचा बियाणे वाटप करून आधार
Deoni, Latur | Oct 22, 2025 मौजे टाकळी ता देवणी येथील मांजरा नदीच्या पूरामूळे अतिवृष्टीमूळे बाधीत झालेल्या टाकळी येथील शेतकर्यांना नाम फांऊडेशनचा आधार टाकळी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कै संतोष मारोती चाळके,याच्या पत्नी अश्विनी संतोष चाळके यांना हरभरा बॅग व बियाणे देण्यात आले व टाकळी येथील नदीकाठच्या एकूण 84 शेतकर्यांना आज ज्वारीचे बियाणे वाटप करण्यात आले यावेळी नाम फांऊडेशनचे समन्वयक रामलिंग शेरे व जंयत पाटील, विवेक पाटील ,माधव कोरे ,वामन पाटील यांच्या बसवंत कोरे आदीसह अनेक शेतकरी उपस्थित होते