जालना तालुक्यातील जळगाव, सोमनाथ बाजीउंब्रद आणि ब्राह्मणखेडा शिवारामध्ये बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं होतं. परंतु, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवार दि. 20 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री आठ वाजता थेट गावामध्ये जाऊन शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बिबट्यापासून कसा बचाव करावा. याबाबत थोडक्यात माहिती दिली. तसेच सावधगिरी आणि सतर्कतेचा इशारा देखील त्यांनी गावकऱ्यांना दिला.