धुळे: मोराणेजवळ सुरत-नागपूर महामार्गाच्या उड्डाणपुलाला भगदाड; ग्रामस्थ आक्रमक
Dhule, Dhule | Sep 16, 2025 सुरत-नागपूर महामार्गावरील मोराणे गावाजवळच्या उड्डाणपुलाला अचानक तब्बल दहा फूट लांबीचे भलेमोठे भगदाड पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुलाचा स्लॅब खाली कोसळल्याचे पाहताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या धोकादायक प्रकारामुळे वाहनधारक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, महामार्ग प्रशासनाने तातडीने वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळवली आहे.