मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत आज जालना जिल्ह्यातील 160 ग्रामपंचायतींमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. मंगळवार दि.18 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम.यांनी ग्रामपंचायतींना दिलेल्या आवाहनाला सरपंच,ग्रामसेवक व कर्मचार्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि लोकसहभाग वाढावा या उद्देशाने समृद्धी पंचायतराज अभियान राबविले जात आहे.