शिरूर: जांबुत येथे साडेतीन वर्षीय मादी बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
Shirur, Pune | Nov 5, 2025 शिरूर तालुक्याच्या बेट भागात मागील वीस दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात तीन निष्पाप जीव गमावले आहेत.या साखळी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने पूर्ण ताकद लावली असून, पिंजरे लावणे, गस्त वाढवणे आणि संशयित बिबट्यांना जेरबंद करण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.