कन्नड: अस्मानी-सुलतानी संकटग्रस्त शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात मदतीचे धनादेश वाटप
कन्नड तालुक्यातील अस्मानी व सुलतानी संकटामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तसेच मृत पशुधन लाभार्थ्यांना शासकीय मदतीचे धनादेश आज दि. ६ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार संजना जाधव व तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी शासन नेहमीच त्यांच्या पाठीशी असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले. शेतकरी बांधवांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.