गोरेगाव: मौजा तुमसर शेतशिवारात ८०० मीटर अल्युमीनीयम कंडक्टर 10 हजार रुपयांचा माल चोरी
दि.1 नोव्हेंबर ते 2 नोव्हेंबर च्या मध्यरात्री दरम्यान मौजा तुमसर शेतशिवारातून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ची लघुदाबाची श्रावण गायधने तुमसर यांच्या शेतातून गेलेले लाईन मधून पोलवर लागलेले 800 मीटर ॲल्युमिनियम कंडक्टर अंदाजे किंमत दहा हजार रुपयाचा माल कोणीतरी अज्ञात चोराने चोरी करून नेल्याने फिर्यादी शशीकुमार निपाने यांच्या तक्रारीवरून दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास गोरेगाव पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.