किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी येथील बांधकामाला अनधिकृत म्हणून रायगड प्राधिकरणाने संबांधत एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये रोप मधून काढलेल्या हिरकणीवाडीच्या फोटोवर "अन् ऑथराईज इंन रेग्युलेटेड एरिया " असा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे हिरकणीवाडी ग्रामस्थांच रहिवास, व्यवसाय धोक्यात येणार आहे. यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये संतापाच वातावरण पहायला मिळत आहे. हिरागवळणीमुळे किल्ले रायगडा एवढाच या हिरकणीवाडीला इतिहास आहे...