खेड: जनशताब्दी एक्सप्रेसच्या ब्रेक लाइनरमधून धूर आल्याने तालुक्यातील अंजनी रेल्वे स्थानकात रेल्वे करण्यात आली उभी
Khed, Ratnagiri | Apr 20, 2024 कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसच्या चाकातील ब्रेक लाइनर जाम होऊन अचानक धूर आल्याने शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास काही काळ ही गाडी तालुक्यातील अंजनी रेल्वे स्थानकात थांबऊन ठेवण्यात आली होती. तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर ही गाडी मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली.