साकोली: भारतीय स्टेट बँक शाखा साकोलीतर्फे जि प शाळा साकोलीत विद्यार्थ्यांची मोफत काढण्यात आली बँक खाती
भारतीय स्टेट बँकेच्या साकोली शाखेतर्फे विद्यार्थ्यांसाठी बुधवार दिनांक 15 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता विशेष उपक्रम राबविण्यात आला त्यात सीएसआर उपक्रमांतर्गत दहा वर्षावरील सर्व विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद हायस्कूल साकोली येथे विद्यार्थ्यांची बँक खाती मोफत उघडण्यात आली व खाते उघडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास मोफत शालेय स्कूल बॅग देण्यात आली यावेळी बँकेचे मॅनेजर भास्कर चाचरकर बँक मित्र चंद्रशेखर कापगते पुष्पा कापगते,श्री कोचे यांची उपस्थिती होती