रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम हिवरा येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या मुकेश गणेशलाल माहुले (३२) याच्यावर रामनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. ५ लिटर मोहफुली दारू जप्त केली. ही कारवाई पोलीस शिपाई सत्यकुमार दुबे यांनी १६ नोव्हेंबर रोजी केली आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .........