धुळे: धुळ्यातील जुना आग्रा रोडवर अग्नितांडव: प्रसिद्ध 'रामभरोसे पंजाब हॉटेल' आगीच्या भक्ष्यस्थानी; सुदैवाने जीवितहानी टळली!
Dhule, Dhule | Nov 2, 2025 धुळे शहरातील जुना आग्रा रोडवरील प्रसिद्ध ‘रामभरोसे पंजाब हॉटेल’ला लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाले. आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण करत सोलर पॅनल, एसी युनिट्स आणि किचनमधील साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाने दोन बंबांसह तत्परतेने येऊन आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने जीवितहानी टळली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पोलिस तपास सुरू आहे.