सिम्बॉयसिस कॉलेज परिसरात आज दुपारी एका बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजच्या परिसरातील मोकळ्या जागेत काही विद्यार्थ्यांनी बिबट्याला वावरताना पाहिले. बिबट्या काही वेळ झाडीमध्ये लपला होता.घटनेची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेतली आहे. बिबट्या नेमका कुठे गेला याचा शोध घेण्यासाठी परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.