चंद्रपूर: उपरी -डोनाळा मार्गावर तीन वाघांचे दर्शन, नागरिकात भीतीचे वातावरण
चंद्रपूर जिल्ह्यातील उपरी-डोनाळा मार्गावर बुधवार (ता. १२) सकाळी अकरा वाजतादरम्यान शेतावर जाताना अनेकांना तीन वाघांचे दर्शन झाले. नागरिकांनी याची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाला हा परिसर गाठला. या भागात आता गस्तही वाढविण्यात आली आहे. याच परिसरातून काही दिवसांपूर्वी चार वाघांना वनविभागाने जेरबंद केले होते. सावली तालुक्यातील शेवटच्या टोकावरील उपरी, डोनाळा परिसर जंगलव्याप्त आहे. या भागात वाघ, बिबड्याचा वावर आहे. वाघ, बिबट्याने या भागातील शेतकऱ्यांच्या पाळीव जनावर हल्ले करू