अंबरनाथ: बदलापूर नगरपरिषदेच्या हद्दीत 19100 दुबार नावं आहेत, शिंदे गटाचे बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असताना मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप होत आहे. अशातच आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 च्या सुमारास शिंदे गटाचे बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी देखील आरोप केले आहेत. ते बदलापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. बदलापूर नगरपरिषदेच्या हद्दीत 19100 दुबार नावं असल्याचं त्यांनी सांगितलं असून इशारा देखील दिला आहे.