बुलढाणा: जिल्ह्याच्या एसपी पदावरून जिल्हा पोलीस दलात महानाट्य; बदली झालेल्या आणि नियुक्ती झालेल्या दोघांमध्ये तणाव
एसपी पदावरून जिल्हा पोलीस दलात महानाट्य सुरू आहे. बदली झालेल्या आणि त्यांच्या जागी नियुक्त झालेल्या अशा दोन एसपी मध्ये आज 30 मे रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान एसपी कार्यालयात तणावाचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याचे अधिकृत एसपी कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे.आधीचे जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची गृह विभागाने बदली केली. त्यांनी कॅट मध्ये धाव घेतली आणि कॅटने त्यांच्या बदलीला स्थगिती दिली.