जावळी: कास पठार परिसरात रानगव्यांचा वावर; पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला रानगव्याचा व्हिडिओ
Jaoli, Satara | Oct 19, 2025 साताऱ्यापासून पश्चिमेकडं सुमारे १५ ते २० किलोमीटर अंतरावर असलेल्या कास पठारावरील फुलांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. या फुलोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घाटाई परिसरात रानगवा आढळला. कास पठार परिसरात फेरफटका मारत असलेला हा रानगवा पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मारला. रानगव्यांच्या दर्शनानं पर्यटकांमध्ये भिंतीचं वातावरण निर्माण झालं.