रेणापूर: रेणापूर मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला
Renapur, Latur | Sep 14, 2025 रेणापूर मध्यम प्रकल्पातून विसर्ग थांबविण्यात आला रेणापूर : रेणापूर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा कमी झाल्यामुळे आज दि. 14 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी ठीक 3:00 वाजता प्रकल्पाचे द्वार क्र. 03 व 04 (एकूण 2 द्वार) पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. यामुळे रेणा नदीपात्रातील सुरू असलेला पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला असून सध्या नदीपात्रात अतिरिक्त पाणी सोडले जात नाही.