पोलीस ठाणे वाठोडा अंतर्गत येणाऱ्या सिम्बॉयसिस कॉलेज रोडवर आज दुपारच्या सुमारास अचानक चालत्या मारुती ओमिनी गाडीला आग लागली. दरम्यान चालक राजेंद्र तांडेकर यांनी वाहनाच्या बाहेर उडी मारल्यामुळे सुदैवाने ते वाचले. यामध्ये संपूर्ण गाडी जळून एक लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने मोठा अपघात टळला वाहनाला आग लागण्याचे कारण अद्यापही अज्ञात असून शॉर्टससर्किट मूळे आग लागल्याचे म्हटले जात आहे