सेलू: झडशी येथे मायक्रोफायनान्स प्रतिनिधीवर कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Seloo, Wardha | Oct 10, 2025 तालुक्यातील झडशी गावात बचत गटाच्या महिलांचे कर्ज प्रकरणाचे अर्ज भरत असलेल्या मायक्रोफायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना गुरुवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे 12.45 वाजता घडली. जखमी प्रतिनिधीचे नाव नयन मनोहर धाबर्डे (वय 27, रा. चाणकी (कोरडे), ता. हिंगणघाट) असे आहे. या घटनेनंतर वैभव बाबाराव तळवेकर (वय 30, रा. झडशी) या आरोपी विरुद्ध दुपारी 3.15 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती ता.10 ला सेलू पोलिसांनी दिली.