दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध फटाक्यांच्या विक्रीवर प्रतिबंध आणण्यासाठी कठोर कारवाईचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. शनिवार दि. 18 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पोलीस अधीक्षक, जालना शहर महानगरपालिका आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद जालना तसेच नगर परिषद व नगर पंचायत प्रमुखांना या संदर्भात अप्पर जिल्हा दंडाधिकारी शशिकांत हदगल यांच्या स्वाक्षरीत पत्र जारी करण्यात आले आहे.