बाभूळगाव: शहरातील अलाहाबाद बँक परिसरात घरफोडी करून अज्ञाताने लंपास केला तब्बल ३.५ लाखाचा मुद्देमाल,बाभूळगाव पोलिसात गुन्हा दाखल
फिर्यादी अरुण बालकृष्ण गुल्हाने यांच्या तक्रारीनुसार 19 ऑक्टोबरला कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराचे दरवाजाचा कुलूप कोंडा तोडून आत मध्ये प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व नगदी दीड लाख रुपये असा एकूण तीन लाख 42 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.याप्रकरणी 19 ऑक्टोबरला रात्री अंदाजे दहा वाजताच्या सुमारास बाभूळगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.