खालापूर: खोपोली शहरात प्रचंड प्रमाणात घाण, कचरा पसरलेला असताना मुख्याधिकारी यांना स्वच्छ खोपोली पुरस्कार मिळालाच कसा आपचा सवाल
खोपोलीत रस्त्यांवर,गल्लीबोळांमध्ये प्रचंड प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलेलं असताना खोपोली शहराचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. पंकज पाटील यांना स्वच्छतेचा पुरस्कार मिळतोच कसा हा गंभीर प्रश्न आहे.शहरातील सर्व प्रभागांचा दौरा करून प्रत्येक वार्डातील असलेले घाण, कचरा यांचे फोटो व्हिडिओ काढून सोशल मीडियावर वायरल करणार आहे व खोपोलीचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांची पोलखोल करणार असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉ. रियाज पठाण यांनी सांगितले.