आज दिनांक पाच नोव्हेंबर दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील फरदापुर येथे हॉटेलमध्ये गुजरात अहमदाबाद येथील व्यापारी अमित भाई ही मुलाच्या लग्नानिमित्त आले होते व ते हॉटेलमध्ये थांबले असता त्यांचे कामाचे कागदपत्र व 15 हजार रुपये ते हॉटेलमध्येच विसरले होते मात्र हॉटेलमध्ये साफसफाई करणाऱ्या कर्मचारी निर्मलाबाई झाल्टे यांनी प्रमाणिकपणा दाखवत सदरील रक्कम व कागदपत्रे मालक जैस्वाल यांच्या स्वाधीन करून सदरील बाब त्यांच्या लक्षात आणून दिली