गुहागर: नेटची केबल लागून जखमी झालेल्या असगोलीतील दुचाकी स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू
वाहनाने उडवलेल्या नेटची केबल लागून जखमी झालेल्या गुहागर तालुक्यातील असगोली येथील ३८ वर्षीय तरुणाचा २० एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता उपचारादरम्यान कराड येथे मृत्यू झाला आहे. सतेश किसन घाणेकर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात गुरुवारी सायंकाळी चार वाजता असगोली येथे घडला होता.