श्रीपत धामनगाव ता.घनसांवगी येथे ७ लक्ष रुपयांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण आमदार हिकमत दादा उढाण यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी आमदार दादांनी ग्रामविकासासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. कार्यक्रमास ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.